Share

संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांतवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

Maharashtra minister Sanjay Shirsat’s son Siddhant Shirsat faces legal notice from a woman claiming to be his wife, alleging mental and physical abuse.

Published On: 

Maharashtra minister Sanjay Shirsat’s son Siddhant Shirsat faces legal notice from a woman claiming to be his wife, alleging mental and physical abuse.

छत्रपती संभाजीनगर | राज्याचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट ( Siddhant Shirsat ) याच्यावर पत्नीने फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट असे पीडित महिलेचे नाव असून, तिने सिद्धांतशी विवाह केला असल्याचा दावा करत, तिने फोटो पुरावे सादर केले आहेत.

जान्हवीने वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस पाठवत सिद्धांतवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्या नोटीसमध्ये मानसिक छळ, धमकी, फसवणूक, आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat’s Son Siddhant Shirsat Accused by Wife

महिलेच्या दाव्यानुसार, मुंबईतील चेंबूर येथे सिद्धांत आणि जान्हवी यांचे दोन वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न झाले. काही काळ सर्व काही सुरळीत होते, मात्र नंतर सिद्धांतने तिसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध सुरु केले. त्यानंतर जान्हवीकडे दुर्लक्ष केले गेले आणि तिचा मानसिक छळ सुरु झाला. जान्हवीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यास परवानगी दिली गेली नाही. ती तिथे गेल्यास “तंगडं तोडेन” अशी धमकीही सिद्धांतकडून दिली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सात दिवसांत जान्हवीला नांदवण्यासाठी सिद्धांतने काही पावले उचलली नाहीत, तर त्याच्याविरोधात तीन वेगवेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा वकिलांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही