🕒 1 min read
मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने अलीकडेच एक खास आणि धक्कादायक आठवण शेअर केली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानच्या कुकिंग शोमध्ये सहभागी झालेल्या सोनालीने सांगितले की, ‘अग बाई अरेच्चा’ चित्रपटातील ‘छम छम करता है’ या गाण्याचं शुटिंग करत असताना ती प्रेग्नंट होती, पण तिला त्याची कल्पनाही नव्हती.
सोनालीने सांगितलं की, “त्या काळात मला प्रेग्नंसीबद्दल काहीच माहिती नव्हती. मी मनापासून डान्स केला. नंतर जेव्हा समजलं, तेव्हा धक्का बसला.” फराह खाननेही यावेळी आठवण सांगितली की, “सोनाली जरा जाड वाटत होती, पण वाटलं लग्नानंतर वजन वाढलं असेल. मात्र नंतर समजलं की ती गरोदर आहे.”
“I had no idea I was pregnant, and I danced”; Sonali Bendre’s unexpected revelation
या अनुभवाच्या आठवणी शेअर करताना फराहने सोनालीचं कौतुक करत म्हटलं की, “प्रेग्नंसीमध्ये संपूर्ण गाण्यावर डान्स करणं ही छोटी गोष्ट नाही. तुझा प्रोफेशनलिझम खूप प्रेरणादायी आहे.”
सोनालीने 2002 मध्ये निर्माता गोल्डी बहलशी लग्न केलं. 2005 मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली होती आणि 1994 मध्ये ‘आग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- PBKS vs MI : “हा फक्त झटका होता”; पराभवानंतर हार्दिक पंड्याचा खेळाडूंना स्पष्ट संदेश
- तुळजापूर-औसा महामार्गावर भीषण अपघात; भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे दुःखद निधन
- नागरिकांनो घरातच थांबा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





