🕒 1 min read
तुळजापूर/लातूर: तुळजापूर-औसा महामार्गावर २६ मे २०२५ रोजी एक दुर्दैवी घटना घडली. भाजपचे नेते व माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे आपल्या वाहनातून बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना पुलावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांच्या कारचा ताबा सुटला. पाण्यावरून गाडी घसरल्याने ती कठड्यावर आदळून थेट खाली कोसळली व चार वेळा पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
R.T. Deshmukh Dies in Tuljapur Car Accident
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तातडीने लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रात आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.
आर. टी. देशमुख कोण होते?
भाजपमध्ये दीर्घकाळ सक्रीय राहिलेल्या आर. टी. देशमुख यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून १३ व्या विधानसभेत प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळावू, प्रेमळ आणि संघटनात्मक होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- नागरिकांनो घरातच थांबा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
- ‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल बाहेर का पडले? चित्रपट सोडण्यामागचं खरं कारण आलं समोर
- ‘पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल’; शशी थरुरांचा अमेरिकेतून इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








