🕒 1 min read
न्यूयॉर्क – पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध अजिबात गंभीर नाही, आणि त्यामुळेच पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे खासदार शशी थरुर ( Shashi Tharoor ) यांनी अमेरिकेतून दिला आहे.
भारताकडून सध्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं एक शिष्टमंडळ दौर्यावर आहे. न्यूयॉर्कमधील ( अमेरिका ) भारतीय वाणिज्य दूतावासात मीडियाशी बोलताना थरुर यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.
Shashi Tharoor warns Pakistan from US
त्यांनी सांगितलं की, 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला ठरवून करण्यात आला होता. हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचा जीव गेला, आणि भारतात हिंसाचार पेटवण्याचा डाव होता. त्यानंतर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले.
थरुर म्हणाले, “भारत आता केवळ एलओसी पार करत नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हल्ले करतो. यामुळे पाकिस्तानला आता स्पष्ट संदेश दिला गेला आहे – हल्ला केलात, तर किंमत मोजावी लागेल.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “भारताला युद्ध नकोय मात्र दहशतवादावर गप्प बसणार नाही!”
📌 महत्वाच्या बातम्या
- “भारताची ऐतिहासिक झेप! जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था”
- SRH vs KKR : हैदराबादचा 110 धावांनी दणदणीत विजय
- “जर मुख्यमंत्री फडणवीस ठरवतील तर भुजबळ थेट उपमुख्यमंत्री!” मोठ्या नेत्याचा दावा