Share

“भारताची ऐतिहासिक झेप! जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था”

India overtakes Japan to become the world’s 4th largest economy in 2025, as per IMF data. This milestone marks a major step in India’s journey towards a $5 trillion economy.

Published On: 

India overtakes Japan to become the world's 4th largest economy in 2025, as per IMF data. This milestone marks a major step in India's journey towards a $5 trillion economy.

नवी दिल्ली : ‘पाच ट्रिलियन इकॉनॉमी’ हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे. 2025 मध्ये भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. निती आयोगाचे CEO बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती देत IMF च्या आकडेवारीचा दाखला दिला आहे.

IMF च्या (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) एप्रिल 2025 च्या ‘World Economic Outlook’ अहवालानुसार भारताची नाममात्र GDP सुमारे $4.187 ट्रिलियनवर पोहोचली असून, जपानची GDP $4.186 ट्रिलियन इतकी आहे. त्यामुळे भारत आता अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

India Becomes World’s 4th Largest Economy in 2025

➤ पाच ट्रिलियनच्या दिशेने पुढे वाटचाल

या ऐतिहासिक यशामुळे भारताच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न आणखी जवळ आले आहे. निती आयोगाच्या मते, योग्य धोरणे राबवली तर भारत पुढील 2.5 ते 3 वर्षांत जर्मनीलाही मागे टाकू शकतो.

➤ जपानला मागे टाकण्याची वेळ

याआधीही अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते, मात्र IMF च्या अलीकडील आकडेवारीनुसार हे स्थान भारताने अधिकृतपणे पटकावलं आहे.  मात्र अंतिम GDP आकडे वर्षअखेरीस स्पष्ट होतील.

➤ भारतीय अर्थव्यवस्थेची आंतरराष्ट्रीय मान्यता

या महत्त्वाच्या आर्थिक टप्प्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढली आहे. गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे वळल्या असून, हे यश जागतिक स्तरावर भारताच्या वाढीचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही