🕒 1 min read
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेने आपल्या कारकिर्दीतला एक धक्कादायक अनुभव शेअर करत कास्टिंग काउचच्या अनुभवावर प्रकाश टाकला आहे. ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेपासून अभिनय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नेहाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिला अश्लील मागणी केली होती. “तुला माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल,” अशी थेट मागणी त्याने केली होती.
नेहाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि अशा प्रसंगांनंतरही इंडस्ट्रीत मेहनतीच्या जोरावर स्थान निर्माण केलं. ती मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे.
Neha Pendse Reveals Casting Couch Shock
नेहाच्या मते, अभिनय क्षेत्रात महिलांना अनेकदा अशा अपमानास्पद परिस्थितींना सामोरे जावे लागते. तरीही तिने हार न मानता स्वतःची नवी ओळख तयार केली. आज ती केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या साड्यांच्या देसी लूकसाठी देखील चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने स्वतःच्या संग्रहातील पारंपरिक पांढरी साडी घालून रेड कार्पेटवर भारतीय संस्कृतीचं भव्य दर्शन घडवलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “रुपाली चाकणकरांच्या योग्यतेवर नीलम गोऱ्हेंचा प्रश्न – महिला आयोगाने योग्य पावले उचलली असती तर…!”
- वैष्णवीला संपवलं… आता मयुरीने उघड केलं विकृत कुटुंबाचं गुपित!
- “फक्त सुंदर म्हणून पद तर 901 तक्रारी, किती महिलांना न्याय मिळाला?; करुणा मुंडेंचा चाकणकरांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now