🕒 1 min read
मुंबई – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात राज्य महिला आयोगाची भूमिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत.
करुणा मुंडे यांनी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “फक्त सुंदर दिसतात म्हणून चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्त केलं गेलं आहे.” त्यांनी चाकणकर यांच्या “चिल्लर” शब्दावरही कडाडून हल्ला चढवला आणि असा शब्द वापरणं हे त्यांच्या अहंकाराचं लक्षण असल्याचं म्हटलं.
Karuna Munde Attacks Rupali Chakankar Over Vaishnavi Suicide Case
मुंडे यांच्यासोबत दोन पीडित महिलाही होत्या, ज्यांच्या तक्रारी महिला आयोगाकडे प्रलंबित आहेत. त्यांनी आरोप केला की, 901 तक्रारींपैकी किती महिलांना न्याय मिळाला याची माहितीच नाही. “आम्हालाही आत्महत्या करावी का?” असा संतप्त सवाल या महिलांनी केला.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, न्याय मिळाला नाही तर 35 हजार महिलांसह महिला आयोगाबाहेर आंदोलन केलं जाईल. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचारासाठी महिला आयोग वापरण्याचा आरोप करत त्यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या नावाखाली ऑनलाईन सट्टेबाजी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
- राज्यात पावसाचा इशारा कायम, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
- ‘भूल चूक माफ’ ची दमदार सुरुवात; ‘रेड 2’ अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत