Share

आयपीएलच्या नावाखाली ऑनलाईन सट्टेबाजी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

Supreme Court issues notice to the Central Government over online betting (IPL betting) apps using IPL’s name. The plea claims celebrities and players promote such apps.

Published On: 

Online betting in the name of IPL, Supreme Court issues notice to Central Government

आयपीएलचा अंतिम टप्पा सुरु असतानाच ऑनलाईन सट्टेबाजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) नावाचा वापर करून सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टेबाजीबाबत (IPL betting) दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

या याचिकेनुसार देशभरात विविध ऑनलाईन अ‍ॅप्सच्या माध्यमातून सट्टेबाजी सुरू असून, त्यात अनेक बॉलीवूड-टॉलीवूड कलाकार आणि काही खेळाडू प्रचार करत आहेत. यामुळे अनेक तरुणांवर मानसिक ताण वाढून आत्महत्येचे प्रकार घडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Online betting in the name of IPL, Supreme Court issues notice to Central Government

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने यास सामाजिक विकृती मानत गंभीर चिंता व्यक्त केली. “हत्यांप्रमाणेच सट्टेबाजीही पूर्णपणे रोखणे कठीण आहे, कारण लोक स्वेच्छेने यात सहभागी होतात,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकारावर केंद्र सरकारने कारवाई करावी, तसेच विविध राज्य सरकारांकडूनही उत्तर मागवण्याची आमची तयारी आहे, असे न्यायालयाने म्हटले. यामुळे ऑनलाईन सट्टेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना काय निर्णय घ्यावे लागतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही