Share

राज्यात पावसाचा इशारा कायम, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD warns of heavy rain in Maharashtra till May 28. Orange alerts for Sindhudurg, Ratnagiri, Raigad and parts of Marathwada. Monsoon advancing towards Kerala.

Published On: 

Panjabrao Dakh Monsoon Update - Farmer looking at cloudy sky waiting for heavy rain

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे संकट (Maharashtra Rain Alert) अद्यापही कायम आहे. हवामान विभागाने राज्यात २४ मेपासून २८ मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आधी दिलेला ऑरेंज अलर्ट मागे घेत यलो अलर्ट जारी करण्यात आला असला, तरी पुढील चार दिवस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Rain warning remains in the state, Meteorological Department issues alert for ‘these’ districts

दरम्यान, मान्सून केरळकडे वाटचाल करत असून, दोन दिवसांत केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप आणि कर्नाटकात पोहोचतील.

सिंधुदुर्ग, बुलढाणा, जळगाव जिल्ह्यांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाण्यात रात्रभर संततधार सुरू होती, तर भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील कांदा उत्पादक शेतकरी वादळी वाऱ्यामुळे अडचणीत आले आहेत. राज्यात अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही