Share

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर! उद्या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून, कोकण आणि विदर्भासह 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published On: 

Weather Update

🕒 1 min read

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यात वातावरण ढगाळ राहणार असून कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Rain Alert) हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केले आहेत. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

आज कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Orange Alert) रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उद्या राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Tomorrow Weather Alert) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव जाणवणार आहे. पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. घाट भागात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. (Monsoon Update)

मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड येथे विजांसह पाऊस होण्याची शक्यता असून, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे. विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा आणि अकोला भागांतही विजांसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मान्सूनने देशातील अनेक भागांत पुढील वाटचाल केली असून, आगामी दिवसांत आणखी काही भागांत तो सक्रिय होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही