महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; मात्र दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातून मान्सूनने आता पूर्णपणे माघार घेतली आहे; मात्र तरीही येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Published On: 

Heavy rain forecast in south india while monsoon withdraws from maharashtra

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या उर्वरित सर्व भागांतून पूर्णपणे माघार घेतली आहे. राज्यातून मान्सून परतला असला तरी, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः तमिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त मान्सूनने गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांच्या काही भागांतून तसेच झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतूनही माघार घेतली आहे. सध्या मान्सूनच्या माघारीची रेषा सुपौल, रांची, सुंदरगड, हैदराबाद, बेळगावी आणि पणजी या भागांतून जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पूर्व भारत आणि ईशान्य भारतासह उत्तर द्वीपकल्पाच्या आणखी काही भागांतून मान्सून पूर्णपणे माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच दिल्ली, पाटणा आणि लखनौमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. ‘स्कायमेट’च्या दाव्यानुसार, पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून तेथून वारे खाली सरकत आहेत.

राज्यात १० ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची प्रक्रिया पूर्ण होणार असून हवामान कोरडे राहील. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता नसून केवळ तुरळक पावसाचा अंदाज आहे. तसेच तापमानात वाढ होण्याचे संकेत ‘स्कायमेट’ने दिले आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट वाऱ्यांमुळे काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो, मात्र यामुळे उष्णता आणि दुष्काळाच्या झळा वाढण्याची भीती आहे. त्यातच अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही