Share

Maharashtra Rain Alert: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

CM Devendra Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, मुंबई, ठाणे आणि परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही झाला असून, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक मार्गांवर वाहतूक मंदावली आहे. (Maharashtra Rain Alert News)

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 6 जुलैपर्यंत राज्यात अपेक्षेपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील काही भागांत मुसळधार पावसासह वादळी वारे आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाचा आढावा घेतला जात असून आवश्यकतेनुसार अलर्ट जारी केले जात आहेत.

अनेक भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही