🕒 1 min read
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चूक माफ’ (Bhool Chuk Maaf) हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा विचार होता, पण मल्टिप्लेक्स साखळीने निर्मात्यांवर केस केल्यानंतर थिएटर रिलीज करावा लागला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अंदाजे ₹6.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
मात्र, हा चित्रपट ‘केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग’ या अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या ओपनिंग डे कमाईला मागे टाकू शकला नाही. केसरी 2 ने पहिल्या दिवशी ₹7.75 कोटींची कमाई केली होती.
‘Bhool Chuk Maaf’ has a strong start; ‘Raid 2’ is still strong at the box office
‘भूल चूक माफ’सह ‘केसरी वीर’ नावाचा सूरज पांचोलीचा चित्रपटही प्रदर्शित झाला, पण त्याची सुरुवात अगदीच फिकी राहिली. त्याने फक्त ₹0.25 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, अजय देवगणचा ‘रेड 2’ अजूनही थिएटरमध्ये यशस्वीपणे चालू आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २४ व्या दिवशीही ₹1.03 कोटींची कमाई केली असून आतापर्यंत त्याचा एकूण गल्ला ₹157.88 कोटींवर पोहोचला आहे.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने ₹19 कोटींची कमाई केली होती. ‘भूल चूक माफ’ पुढच्या दिवसांत किती वेग घेतो आणि ‘रेड 2’ला मागे टाकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे पोलिसांचा काळा चेहरा: वैष्णवी हगवणे प्रकरण, पोर्शे केस, आणि वाढते पोलिस-गुन्हेगार साटेलोट
- स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी फडणवीसांचे रणशिंग, भाजप कार्यकर्त्यांना ‘ताकदीनं काम करा’चा आदेश
- “पिसाळलेल्या संभाजी भिडेची नसबंदी करा!” – भिडे यांच्या ‘शिवराज्याभिषेक’ वक्तव्यावरून शिवप्रेमी संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












