🕒 1 min read
रायगड | ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्याने मनोहर ऊर्फ संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून ‘राजकारण करू नका, ती तशीच राहू द्या’ असे विधानही त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
संभाजी ब्रिगेड या संघटनेने भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांना “पिसाळलेले” असे संबोधले आहे. त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, “६ जून हा दिवस नामशेष करा म्हणणं म्हणजे शिवद्रोहच आहे. भिडेंच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय, त्यामुळे त्यांना येरवड्याच्या मानसिक रुग्णालयात पाठवावं, त्याचा खर्च आम्ही करू.”
Amol Mitkari slammed Sambhaji Bhide
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अधिक कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “जो माणूस ६ जूनच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेकाला विरोध करतो, तो नक्कीच पिसाळलेला आहे. आणि पिसाळलेल्याची तात्काळ नसबंदी होणे समाजहिताचे आहे.”
संभाजी भिडे यांच्यावर अनेक वर्षांपासून जातीय तेढ वाढवण्याचे, धर्मांध विचार पसरवण्याचे आरोप होत आले आहेत. परंतु यावेळी त्यांच्या वक्तव्याने त्यांच्याच समर्थकांमध्येही संभ्रम निर्माण केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘पिंकीताई’चा करिश्मा: वैष्णवीला बोलूही देत नव्हती! – मोठ्या सुनेनं उघड केला नणंदेचा खरा चेहरा
- “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” – वाचा राजेंद्र हगवणेंचं धक्कादायक उत्तर!
- “कर्तव्य पार पाडलं असतं तर चिडचिड झाली नसती!” – रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर घणाघात