Share

“कर्तव्य पार पाडलं असतं तर चिडचिड झाली नसती!” – रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर घणाघात

After criticism from Rohini Khadse, Rupali Chakankar hits back with a sharp reply in the Vaishnavi Hagwane suicide case.

Published On: 

After criticism from Rohini Khadse, Rupali Chakankar hits back with a sharp reply in the Vaishnavi Hagwane suicide case.

🕒 1 min read

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणावरून संतापाचा सूर चढताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सहानुभूती व्यक्त केली. मात्र त्यांच्या या भेटीवर रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आणि चाकणकरांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं.

रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ शेअर करत रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केलीय. यांची चिड चिड काही थांबे ना ! असे म्हणत रोहिणी खडसेंनी व्हिडिओ शेअर केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा वैष्णवी यांच्या घरी गेल्या असता सामान्य माणसांनी त्यांना जाब विचारला, तर पुन्हा अध्यक्षांची चिड चिड सुरू झाली. कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले असते तर कदाचित आज चिड चिड करण्याची वेळ आली नसती, असे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

Rupali Chakankar Replies to Rohini Khadse

यावर आता चाकणकरांनीही प्रत्युत्तर देत, “दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये,” असा टोला लगावला. चाकणकर म्हणाल्या की, रोहिणी खडसेंच्या घरातही महिलांवरील अत्याचाराची तक्रार दाखल आहे. या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींनी टीका करताना चार वेळा विचार केला पाहिजे.

दरम्यान, मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी देखील चाकणकर यांना कस्पटे कुटुंबाच्या भेटीवेळी जाब विचारला. छावा संघटनेचे धनंजय जाधव आणि इतर महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढत “वेळेत योग्य ती कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता,” असे म्हटले.  रोहिणी खडसे यांनी देखील वकिलांना विनंती करत, “या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये,” असं खुले पत्र जारी केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Pune Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या