🕒 1 min read
मुंबई | महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मोठ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. भुजबळांनी मंगळवारी राजभवनात शपथ घेतली.
याआधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज होते. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती व फडणवीसांची भेट घेतली होती. आता त्यांना त्यांच्या जुन्या खात्याची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal Gets Food and Civil Supplies Ministry
“हे माझंच खातं होतं, आता पुन्हा माझ्याकडे आलंय,” असं भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात देखील या खात्याने उत्तम कामगिरी केली आणि यापुढे देखील गरजूंना दर्जेदार अन्नधान्य मिळावं, हेच ध्येय राहील.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘वेळेत दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती’, पुण्यात रुपाली चाकणकरांना घेरलं; चाकणकरांचा काढता पाय
- ६ जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष करा, वाघ्या कुत्र्याची समाधी न हटवता राखा! – संभाजी भिडे
- शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून ऐवजी तिथीनुसार साजरा करा – संभाजी भिडेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











