🕒 1 min read
कोल्हापुर – छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सध्या ६ जून रोजी साजरा केला जातो. मात्र, हा सोहळा तिथीप्रमाणे साजरा करावा आणि ६ जूनचा सोहळा कायमस्वरूपी थांबवावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी केली आहे. त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, शिवराज्याभिषेकासारखे ऐतिहासिक सोहळे राजकारणासाठी वापरले जाऊ नयेत.
Shivrajyabhishek Must Follow Hindu Tithi, Not June 6: Sambhaji Bhide
दरम्यान, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या कथित समाधीवरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी ३१ मे पूर्वी ही समाधी हटवण्याची मागणी करत पुरातत्व विभागाकडे पत्र पाठवले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणताही पुरावा नाही आणि ती रचना कपोलकल्पित आहे.
वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद असून, काहींनी ती भक्तीभावातून उभारलेली मानली आहे. मात्र, ही समाधी हटवू नये, अशी भूमिका संभाजी भिडे यांनी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, ही एक लोकश्रद्धा आहे आणि अशा श्रद्धांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून ऐवजी तिथीनुसार साजरा करा – संभाजी भिडेंची मागणी
- पोलिसांनी वेळीच कारवाई झाली असती, तर वैष्णवी आज जिवंत असती; मयुरी हगवणेचा मोठा आरोप!
- पिस्तूल, धमक्या आणि अश्लील व्हिडिओ! निलेश चव्हाणचा काळा इतिहास वाचा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now