🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी – मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता नवा धक्कादायक तपशील समोर आला आहे. वैष्णवीच्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक 19 मे रोजी कर्वेनगरमधील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, त्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत घराबाहेर हाकलून लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणवर भादंवि कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेला निलेश चव्हाण पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर 2019 मध्ये स्वतःच्या पत्नीचा स्पाय कॅमने आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचा गुन्हाही दाखल होता. एवढेच नव्हे तर पत्नीला धमकावून, जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याच्या आरोपाचाही समावेश आहे. 2022 मध्ये पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जालाही पुणे सत्र न्यायालयाने नकार दिला होता. मात्र तरीही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती.
Vaishnavi Hagavane Case: Nilesh Chavhan Threatens Family
या सगळ्या प्रकरणांमुळे निलेश चव्हाणचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तो पुण्यात बांधकाम आणि पोकलेन मशीन व्यवसायात असून त्याचे कर्वेनगरमधील औदुंबर पार्क सोसायटीत तीन फ्लॅट आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘पहिल्याच दिवशी सुमोटो घेतलं!’; राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेत
- वैष्णवी प्रकरणात मकोका लागणार का?; फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
- सून आत्महत्या करते आणि हे नराधम मटण खातात! वैष्णवी प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल









