🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींवर मकोका (MCOCA) लावण्यात येणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा लॉजिकल एंड होईपर्यंत पोलीस आवश्यक त्या सर्व गोष्टी करतील.”
Will MCOCA Be Applied in Vaishnavi Hagwane Case?
मकोका लावण्यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, “मकोका लावण्यासाठी विशिष्ट कायदेशीर निकष आहेत. ते निकष पूर्ण झाले, तरच मकोका लागू शकतो. सध्या त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.”
फडणवीस पुढे म्हणाले, “आजच्या काळात सून-मुली यांच्यात भेदभाव करणे अक्षम्य आहे. सून छळ सहन करावा लागून आत्महत्या करावी लागली, हे फारच दुर्दैवी आहे. समाजाने हे पाप म्हणूनच पाहावं.”
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीबाबत विचारता फडणवीस म्हणाले, “कोणतंही लग्नकार्य असलं की राजकीय नेते, कार्यकर्ते जातात. तेव्हा पुढे काय घडणार आहे, हे कुणालाही माहीत नसतं. त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- सून आत्महत्या करते आणि हे नराधम मटण खातात! वैष्णवी प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
- न्यूयॉर्कमधील NMACC इव्हेंटमध्ये निता अंबानींचा खास भारतीय डिझाईनसह हर्मेस बिर्किन बॅग लुक चर्चेत
- IPL 2025: मोहम्मद सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं पुढच्याच बॉलवर दिला रिप्लाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now