Share

सून आत्महत्या करते आणि हे नराधम मटण खातात! वैष्णवी प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Vaishnavi Hagwane ended her life due to dowry torture. Her father-in-law and brother-in-law, who were on the run, were caught after they were seen feasting on mutton at a hotel.

Published On: 

Vaishnavi Hagwane ended her life due to dowry torture. Her father-in-law and brother-in-law, who were on the run, were caught after they were seen feasting on mutton at a hotel.

🕒 1 min read

तळेगाव | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु अटकेआधी या दोघांनी तळेगावमधील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे. या अमानवी आणि निर्लज्ज वर्तनामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

१६ मे रोजी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या सासरच्या मंडळींनी दोन कोटी रुपयांसाठी हुंड्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. याप्रकरणात सासू, नणंदला आधीच अटक झाली होती.

Vaishnavi Hagwane Suicide Case

फरार असलेले राजेंद्र व सुशील हगवणे पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे अटक केले. मात्र अटकेपूर्वी हे दोघे एका हॉटेलमध्ये आरामात मटण खात असल्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो बघून अनेकांनी टीका केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूचा यात काहीच परिणाम न झाल्यासारखं या नराधमांचं वर्तन असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या