🕒 1 min read
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चनने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने आणि साडी-सिंदूर लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, दुसऱ्या दिवशी तिच्या खास पोशाखाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ऐश्वर्याने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांच्याकडून खास बनवलेला काळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता, ज्याला चांदीचा भव्य केप जोडलेला होता. विशेष म्हणजे, हा केप वाराणसीमध्ये हाताने विणलेला असून त्यावर भगवद्गीतेतील श्लोक लिहिलेला आहे – “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन…” या श्लोकामार्फत तिने भारतीय आध्यात्मिकतेचं जागतिक पातळीवर दर्शन घडवलं.
Cannes 2025: Aishwarya Rai wears a cape with Bhagavad Gita verses; Honors Indian tradition
या गाउनवर ब्रह्मांडाच्या अमूर्त कलाकृतीसारखा डिझाइन होता, ज्यात चांदी, सोनं, चारकोल आणि काळ्या रंगांचा वापर करून मायक्रो ग्लास क्रिस्टल्सने सजावट केली होती.
या लुकसोबत ऐश्वर्याने bold लाल लिपस्टिक वापरली आणि केस मोकळे ठेवले – तिच्या नेहमीच्या sleek hairdo पासून वेगळा अंदाज. तिच्या सोबत मुलगी आराध्या बच्चनदेखील होती आणि दोघींचं black ट्विनिंग लुक प्रेक्षकांचं मन जिंकलं. ऐश्वर्याने दिलेल्या ‘नमस्ते’ पोझने देखील उपस्थितांची मने जिंकली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सुशांतची आत्महत्या नाही, त्याला मारलं गेलंय’; उषा नाडकर्णींचे खळबळजनक वक्तव्य
- वैष्णवीच्या सासऱ्याने कपडे फाडले, दिराने मारहाण केली; मयुरीचा धक्कादायक खुलासा
- वैष्णवीनंतर दीपा! फक्त 1 महिन्यात नववधूची आत्महत्या! 4 तोळे सोने, 10 लाख खर्च, पण सासरकडून छळ थांबला नाही