प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःच्या आक्रमक शैलीत दणदणीत पुनरागमन केले आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावून भारतीय संघात परतण्याबाबत श्रेयस अय्यरला धोक्याचा इशारा दिला आहे.
शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील जादवपूर युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या दुसऱ्या मैदानावर मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमारने गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमण करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली.
या शानदार खेळीदरम्यान सूर्यकुमारने अवघ्या २१ चेंडूत नाबाद ६० धावा कुटल्या. २८५.७१ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच गगनभेदी षटकार लगावले.
सूर्यकुमारच्या या अत्यंत आक्रमक आणि पूर्णपणे नियंत्रणाखालील फलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या संघाने हैदराबादचा सात गडी राखून सहज पराभव केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना-तनुश्रीच्या २००८ मधील वादावर महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘सेटवर काहीही…’
- संजय राऊत यांचा खळबळजनक दावा: ‘त्या’ वक्तव्यानंतरच अजितदादांचा विमान अपघातात संशयास्पद मृत्यू, कुटुंबाच्या मौनावर सवाल
- सुप्रिया सुळेंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकला; संजय राऊत यांचा मोठा दावा








