Share

‘पहिल्याच दिवशी सुमोटो घेतलं!’; राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेत

After Rajendra Hagwane’s arrest in the Vaishnavi suicide case, Women Commission chief Rupali Chakankar tweeted support for strict action and praised the police investigation.

Published On: 

Rupali Chakankar Reacts After Rajendra Hagwane's Arrest in Vaishnavi Hagawane Suicide Case

पुणे | प्रतिनिधी – मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर आज अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले दोघे पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांना सध्या बावधन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

या प्रकरणात आधीच पती शशांक, सासू लता आणि नणंद यांना अटक झाली होती. शशांक हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) याचा पदाधिकारी होता, मात्र काल त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

Rupali Chakankar Reacts After Rajendra Hagwane’s Arrest in Vaishnavi Suicide Case

राजकीय संबंधांमुळे आरोपी वाचतील की काय अशी चिंता समाजात व्यक्त केली जात होती. पण या अटकेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्य महिला आयोगाने पहिल्याच दिवशी सुमोटो घेतलं होतं. कायदा आणि प्रशासन उत्तम काम करत आहे. गुन्हा नोंद आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे.”

राज्य सरकारकडून या प्रकरणात कडक कारवाईचं आश्वासन देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही