सांगली | १४ एप्रिल २०२५
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सांगली शहरात घडली. माळी गल्ली परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत भिडे गुरुजींच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भिडे गुरुजी रात्री अकराच्या सुमारास एका समर्थकाच्या घरी जेवण करून परतत असताना ही घटना घडली. त्यानंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Sambhaji Bhide Injured in Dog Attack While Returning Home
अलीकडे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजे छत्रपती आणि भिडे यांच्यात मतभेद झाले होते. भिडे यांनी वाघ्याच्या कथेला ऐतिहासिक मान्यता असल्याचा दावा केला होता, तर संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याला “अतिक्रमण” ठरवत पुतळा हटवण्याची मागणी केली होती. भिडे गुरुजींनी वाघ्या कुत्र्याच्या समर्थन करताना म्हणाले होते की, “माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात.”
महत्वाच्या बातम्या