Share

Fact Check – लता मंगेशकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भीमगीत गाण्यास नकार दिला?

During a lecture organized by the Wamandada Kardak Study Center at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, activist Dr. Ravichandra Hadsankar claimed that renowned poet Wamandada Kardak had once personally requested Lata Mangeshkar to sing a Bhimgeet (a song in honor of Ambedkar), but she declined.

Later, poets Namdeo Dhasal and Raja Dhale also made attempts, but were unsuccessful. Disappointed, Wamandada is said to have remarked, “Sing for stones, not for humans.”

Published On: 

Why did Lata Mangeshkar never sing a song dedicated to Dr. B.R. Ambedkar?

🕒 1 min read

मुंबई | १४ एप्रिल २०२५:

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर एक जुना आणि संवेदनशील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एकही गीत का गायले नाही?

सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविचंद्र हडसणकर यांनी एका व्याख्यानात दावा केला की, महान कवी वामनदादा कर्डक यांच्या विनंतीनंतरही लता मंगेशकर यांनी भीमगीत गायनास नकार दिला होता. हे वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात करण्यात आले होते.

डॉ. हडसणकर यांनी सांगितले की, “वामनदादा कर्डक हे लता मंगेशकर यांना भेटलो होते. त्यांनी आदराने पाहुणचार केला, पण त्यांनी भीमगीत गाण्यास नकार दिला. त्यानंतर नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांनीही प्रयत्न केले, मात्र यश आले नाही.”

या प्रसंगानंतर वामनदादांनी संतापून “तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसांची गाणी नका गाऊ.” असे उद्गार काढले असल्याचे डॉ. हडसणकर यांनी सांगितले.

हडसणकर यांच्या मते, तत्कालीन सांस्कृतिक व्यवस्थेत दलित, वंचित समाजाचे भावविश्व मुख्य प्रवाहातील संगीतापासून दूर ठेवले जात होते. अशा वेळी वामनदादा यांनी त्यांच्या वेदना काव्यातून प्रकट केल्या आणि त्यांना जनतेचा कवी बनवले.

Why did Lata Mangeshkar never sing a song dedicated to Dr. B.R. Ambedkar?

हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही अधिकृत पुरावे नाहीत. लता मंगेशकर यांनी मात्र सार्वजनिकरित्या डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली होती. २०१७ साली त्यांनी ट्विट केले होते.

लता मंगेशकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर लिहिले होते –

“नमस्कार. भारतीय संविधान के शिल्पकार आदरणीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी की जयंती पर मैं उनको विनम्र अभिवादन करती हूं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!