बाबांचे लेकरे बाबासाहेब आंबेडकरांना देखील शिव्या देतील; Ketaki Chitale चे स्फोटक व्यक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ketaki Chitale । अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. संविधानामधील आरक्षण व अट्रॉसिटी, हे दोन कायदे काढून टाकले तर उद्या ही बाबांचे (Dr. Babasaheb Ambedkar ) लेकरे फक्त संविधानाला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील शिव्या द्यायला लागतील असा दावा केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्यावर केल्याला या वादग्रस्त पोस्टने मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केतकी हिने सोशल मीडिया अकाउंटवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची पोस्ट शेयर केली होती, त्यावर एका व्यक्तीने तिला कंमेंट केली की, ” या राम मंदिराचा सामान्य जनतेला काय फायदा? मतदानाचा अधिकार तर बाबासाहेबांनी दिला आहे.” अशी कंमेंट केली.

त्यावर तिने ( Ketaki Chitale ) त्याला उत्तर देत, जवाहरलाल नेहरू यांनी संविधानावर सही केल्याचे सांगत खालील वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर केली.

Ketaki Chitale Social Media Post 

द्वेष इतका की
१. संविधान संविधान ओरडत सुटायचे,
२. मनुवादी मनुवादी करून बिनबुडाचे बरळायचे,
३. अट्रॉसिटी ची खोटी केस टाकायची.
संविधानामधील आरक्षण व अट्रॉसिटी, हे दोन कायदे काढून टाकले तर उद्या ही लेकरे फक्त संविधानाला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील शिव्या द्यायला लागतील.
हे दोन्ही कायदे त्या त्या काळाची गरज होती, अगदी मान्य आहे; पण आज हे ढाल म्हणून संविधानातील कायदे लोकं तलवार म्हणून वापरत आहेत. म्हणून हे कायदे रद्द करणे आजच्या काळाची गरज आहे.
#UniformCivilLaw
#UniformCriminalLaw
।।जय हिंद।।
।।वंदेमातरम्।।
।। भारत माता की जय।।
🙏
🇮🇳

Ketaki Chitale Social Media Post 

महत्वाच्या बातम्या