Ketaki Chitale – एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा…; मराठा आंदोलकांना केतकी चितळेचा टोला

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ketaki Chitale –  मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation Protest ) मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  साखळी उपोषण करण्यात येत आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे, रितेश देशमुखने देखील एक ट्विट करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समर्थन दाखवले.

तर दुसरीकडे उपोषणाला विरोधही होताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक एसटी फोडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Ketaki Chitale Post on Maratha Reservation Protest

त्यात तिने म्हटले आहे की, “एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे.

।।जय हिंद।। …।।वंदेमातरम्।। …भारत माता की जय” असे म्हणत केतकीने मराठा आरक्षण आंदोलनाला ( Maratha Reservation Protest ) विरोध दर्शवला आहे.

केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती तिच्या पोस्ट वर अमित खंडागळे ला उत्तर देत म्हणाली  ”सामान्य जनतेची एस टी फोडून कुणाचे नुकसान होते याचा विचार करा जरा. तोड फोड करायची असेल तर ज्यांच्या “हक्का” साठी लढताय, त्यांचेच नुकसान का करताय? तो दगड काच फोडून चालकाला लागला असता तर?” असे तिचे म्हणणे आहे. पण असे केल्याने तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का बुवा?”

महत्वाच्या बातम्या –

 

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe