Share

संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प Shirish Maharaj More यांची आत्महत्या

पुणे ( देहू ) | संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज व प्रसिध्द व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे ( Shirish Maharaj More ) यांनी आज (शुक्रवार, ५ फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले शिरीष मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा लौकीक होता. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह देखील ठरला होता व साखरपुडा समारंभ देखील झाला होता.

मोरे प्रखर हिंदूत्ववादी विचारक होते, “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी केले होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करीत असत.

Shirish Maharaj More Dies by Suicide

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकाला उपरण्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.  त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज मोरे यांचे निगडी येथे इडलीचे उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या

पुणे ( देहू ) | संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज व प्रसिध्द व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे ( Shirish …

पुढे वाचा

Pune Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now