ajit pawar | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी बारामती मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. बारामती मतदारसंघातील झारगरवाडीत प्रचारादरम्यान त्यांनी काही मतदारांशी संवाद साधला.
बारामतीच्या विकासाच्या जोरावर आपण विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच “मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने उद्या काहीही झालं तरी महायुतीचं सरकार येणार येणार येणार. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला तिथे चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार”, असं विधान अजित पवार यांनी केलं.
अजित पवारांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विधानाची आठवण नागरिकांना झाली.
महत्वाच्या बातम्या