Ajit Pawar यांनी सांगलीतील ( तासगाव ) येथील सभेत पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आरोप केले. सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करावी, म्हणून आर. आर. पाटील यांनी फाईलवर स्वाक्षरी करून माझा केसानं गळा कापयाचे धंदे केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. ते आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. या आरोपांचं खंडन करायला आबा नाहीत. आपली संस्कृती सांगते हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलत नाहीत, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.
यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ”सिंचन घोटाळा हा काय अजित पवार यांची पाठ सोडत नाही. मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता. मी माझ्या कार्यकाळात कधीच 70 कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही. माझी कुठल्याही फाईलवर सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती, माझा नाहक बळी घेतला आणि 2014 साली अजित पवार यांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली.” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Smita Patil on Ajit Pawar Statement About R R Patil
महत्वाच्या बातम्या