देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे देवेंद्र फडणवीस.
त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या