Anna Bansode | पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, मावळ. येथून आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. पिंपरी मतदारसंघातून दोनवेळा बनसोडे निवडून आले.
आता तिसऱ्यावेळी पुन्हा अण्णा बनसोडे यांचेच पारडे जड असल्याचे पहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे आमदार बनसोडे यांच्या कार्याचा झंझावात पाहता यावेळी 2024 च्या विधानसभेसाठी सहजासहजी कुणाचा निभाव लागेल, असे सध्यातरी वाटत नाही. पिंपरीतील मतदारांचा कौल पाहता यावेळीदेखील अण्णाच निवडून येतील, असा सूर येथील मतदारांमध्ये दिसून येतो.
राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी बनसोडे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. परंतु अजित पवारांनी विद्यमान आमदार बनसोडे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आमदार बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय तसेच अत्यंत विश्वासू मानले जातात.
Anna Bansode Ajit Pawar Pimpri Vidhan Sabha Election
महत्वाच्या बातम्या
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले