Share

पैठण मतदारसंघात ठाकरे गटाकडून मनोज पेरेंचे नाव आघाडीवर; भुमरेंना तगडे आव्हान

manoj pere paithan vidhan sabha election

Manoj Pere Paithan Vidhan Sabha Election 2024 ।  छत्रपती संभाजीनगर मधील पैठण मतदारसंघात मोठी घडामोड होतांना दिसत आहे. शिंदे गटाकडून खासदार संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, तर ठाकरे गटाकडून मनोज पेरे, दत्ता गोर्डे, सचिन घायाळ इच्छूक उमेदवार आहेत. मनोज पेरे निष्ठावंत आहेत तर गोर्डे, घायाळ निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

संदीपान भुमरे यांना म्हणजेच शिवसेनेला ५  वेळा या मतदार संघात विजय मिळवता आला आहे. पण आता भुमरे एकनाथ शिंदे गटात असल्याने आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने त्यांचे पुत्र विलास भुमरे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.

दरम्यान, मातोश्री वरून मोठी बातमी समोर आली आहे, ‘निष्ठावंत’ असलेले मनोज पेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याचे कळते आहे. सुरवातीला दत्ता गोर्डे यांच्यासाठी अंबादास दानवे यांनी प्रयत्न केला होता, परंतु दत्ता गोर्डे आणि सचिन घायाळ यांच्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे, याने ठाकरे गटाला फटका बसू शकत असल्याने ठाकरे गटाकडून प्रतिष्ठेचा असलेला पैठण मतदार संघात निष्ठावंत म्हणून मनोज पेरे यांची वर्णी लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाची आयातावर मदार असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे ( भाजपा ) वैजापूर – डॉ. दिनेश परदेशी ( भाजपा ), सिल्लोड – सुरेश बनकर ( भाजपा ), पैठणमध्ये राष्ट्रवादी मधून आयात दत्ता गोर्डे यांना संधी दिली असती तर ठाकरे गटाची मोठी नाचक्की झाली असती.

गद्दार भामट्याला सहज पकडून ठेवले असते; ठाकरेंचे संदिपान भुमरेंवर टीकास्त्र

पैठण ही संताची भुमी आहे. पैठणचा गद्दार गद्दारीची दारू प्यायला गेला. आता गद्दारीला गाडण्याची वेळ आली आहे. कारण ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही, गद्दारी फक्त उद्धव ठाकरेंशी नाही तर पैठण आणि पैठणकरांशी आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे.

साधा स्लीपबॉय होता संधी दिली तर आमदार झाला. पाच वेळा आमदार झाला तर माला वाटला की निष्ठावान आहे आता तरी मंत्री करावा त्यामुळे मी मंत्री केला.

ज्या दिवशी गद्दारी झाली तेव्हा मी त्यांना पकडून ठेवू शकलो असतो. मी मुख्यमंत्री होतो, या भामट्याला सहज पकडून ठेवलं असतं. पण जो मनाने सडला आहे, मनाने विकला आहे असा एकही साथीदार मला नकोय. मी त्यांना दारं मोकळी केली आणि म्हटलं गेट आऊट.

भुमरेंनी ३० कोटी रुपयांचा भूखंड लाटला

२ ० २ १ अली पैठण नगर परिषदेच्या हद्दीत असलेला तब्बल ३० कोटी रुपयांचा भूखंड लाटल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे महाविकास आघाडीने केली होती.  भुमरे यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या मुलाला शासकीय भुखंड दिला असल्याचा आरोप आहे. 

रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड केला म्हणून भुमरेंची एकाला मारहाण!

रणजित नरवडे यांनी रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार सर्वांसमोर आणला होता. याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार २०१८ मध्ये या रस्त्याचे काम झालेच नाही. मात्र तरीही या रस्त्याचे बोगस बिल लाटले गेले. नरवडे यांनी तक्रार दाखल केल्याचा राग धरून संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली होती.

भुमरेंची विकासकामांमध्ये टक्केवारी

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना विकासकामांमध्ये 15 टक्के द्यावे लागतात असा गंभीर आरोप सोसायटीच्या चेअरमनने केला होता. विशेष म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे व्यासपीठावर असतांना त्यांच्यासमोरच हे आरोप करण्यात आले होते.

भुमरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहे. उदा. बेकायदेशीर दारू विक्री, विकास कामात टक्केवारी नातेवाईकांना कंत्राटे मिळून देणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत.

Manoj Pere Paithan Vidhan Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

Manoj Pere Paithan Vidhan Sabha Election 2024 | मातोश्री वरून मोठी बातमी समोर आली आहे, ‘निष्ठावंत’ असलेले मनोज पेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याचे कळते आहे.

Maharashtra Chhatrapati Sambhajinagar Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now