🕒 1 min read
पैठण । Sanjay Raut । Chandrakant Khaire VS Ambadas Danve । राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. काही दिवसातच निवडणूक आयोग निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. पक्षाचे अधिकृत तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तसेच आयाराम-गयाराम यांचीही तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेवर आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केल्या नंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची २०२४ ची विधानसभा निवडणुक ही अस्थित्वाची लडाई असणार आहे. एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे गट ‘गद्दार’ असा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले असून ठाकरे गट आक्रमकतेने निवडणूक लढवणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील पैठण विधानसभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संदीपान भुमरे यांना म्हणजेच शिवसेनेला ५ वेळा या मतदार संघात विजय मिळवता आला आहे. पण आता भुमरे एकनाथ शिंदे गटात असल्याने आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने त्यांचे पुत्र विलास भुमरे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
सद्या शिवसेना ( एकनाथ शिंदे ), भाजप आणि राष्ट्रवादी ( अजित पवार ) यांची महायुती असल्याने विद्यमान आमदाराना किंवा पक्षातील नेत्याला तिकीट मिळणार आहे. संदीपान भुमरे खासदार झाल्याने पुत्र विलास भुमरे यांना शिवसेनेचे अधिकृत तिकीट मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, अजित पवार गटातील दत्ता गोर्डे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार नसल्याची कल्पना आल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात काही दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या उपस्थित प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असल्याची त्यांनी जाहीर केले होते.
दत्ता गोर्डे यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा गटातील कार्यकर्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. भुमरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर मनोज पेरे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत पैठण मतदार संघात ठाकरे गटाची शिवसेना नावारूपाला आणली. जवळजवळ पैठण मतदार संघातील २२५ गावात मनोज पेरे यांनी आपला जनसंपर्क दांडगा केला आहे. मनोज पेरे पाटील यांच्याकडे जनता ‘निष्ठावान’ आणि ‘आश्वासक’ चेहरा म्हणून पाहत आहे.
निष्ठावानांना डावलून ठाकरे राष्ट्रवादीतील आयात उमेदवाराला संधी देणार का? याकडे पैठण मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले होते. अंबादास दानवे यांनी पेरे यांना डावलत दत्ता गोर्डे यांना झुकते माप देत, उमेदवारी निश्चित केली होती. मात्र, संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांनी सचिन घायाळ यांना गळ घालून ठाकरे गटात आणून दानवे यांचे पैठण मतदार संघातील महत्व कमी केले. छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेवर ( ठाकरे गट ) आपलेच वर्चस्व असावे, यासाठी खैरे आणि दानवे यांच्यात संघर्ष सुरू आहे.
Chandrakant Khaire VS Ambadas Danve
पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या आवारात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह सर्व संचालकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सचिन घायाळ यांच्यासह सर्व संचालकांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश करून घेतला.
सचिन घायाळ यांच्या प्रवेशामुळे ठकरे गटात धुसफूस उघड झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पैठण दौऱ्यावेळी सचिन घायाळ यांना दत्ता गोर्डेनी अपमानास्पद वागणूक देत, त्यांच्याशी मोठा वाद केला होता. त्यानंतर साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात गोर्डे दिसलेच नाहीत. अंबादास दानवेंचे चेहऱ्यावर नाराजीचे सूर दिसून येत होते. त्यामुळे पैठण विधानसभेत संजय राऊत, चंद्रकांत खैरेंच्या कुशल खेळीने अंबादास दानवेंची कोंडी झाल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
दुसरीकडे पैठण विधानसभामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख दावेदार मनोज पेरे आणि सचिन घायाळ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मनोज पेरे पाटील यांच्याकडे जनता ‘निष्ठावान’ आणि ‘आश्वासक’ चेहरा म्हणून पाहत आहे. सचिन घायाळ सोबतीला आल्याने पेरे यांचे तालुक्यात वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Sanjay Raut | Uddhav Thackeray | Manoj Pere | Sachin Ghayal
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गटाच्या युवा नेत्याने मागितली २५ लाख रुपयांची खंडणी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच ‘सुरत’ लुटली नाही – देवेंद्र फडणवीस
- शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












