Share

मतदान करणे हे आपले आद्यकर्तव्य; शिक्षकांनी मतदार जनजागृतीत योगदान द्यावे

vidhan sabha election sambhajinagar

देशाचे युवक हे देशाचे भविष्य आहेत. तेव्हा आपले भवितव्य ठरवणारे आपले लोकप्रतिनिधी कोण असणार याची निवड करण्याची संधी ही आपल्याला निवडणूकीच्या निमित्ताने मिळते. यासंधीचे सोने करीत आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एमआयटी महाविद्यालयात केले.

एमआयटी येथे आज १०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघा अंतर्गत स्वीप अर्थात मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, एमआयटीचे महासंचालक मुनिश शर्मा, उपकुलसचिव मकरंद वैष्णव, स्वीप नोडल अधिकारी दीपाली थावरे आदी यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या संगित विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर भारुड व गीते सादर करुन उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.  तसेच मतदार जनजागृतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही जिल्हाधिकारी स्वामीयांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपले मतदान करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. युवकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य वापरायला हवा. मतदानाप्रति  युवकांमध्ये उत्साह असायला हवा. त्यांनी आपल्या मताचा हक्क वापरतांना आपल्या सभवतालच्या लोकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे,असे आवाहन त्यांनी केले.

टपाली मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या

जेष्ठ नागरिक वय वर्षे ८५ पेक्ष जास्त, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान प्रक्रियेची सुविधा सहज आणि सोपी पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकाही मतदाराचे मतदान राहणार नाही याची काळजी घेऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी,असे  निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.      

जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघातील टपाली मतदान प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, नोडल अधिकारी चंद्रकांत पाटील, प्रादेशिक पर्यटन अधिकारी प्रभोदय मुळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांची उपस्थिती होती.   

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, टपाली मतदान प्रक्रियेतील फॉर्म, विविध नमुने व त्यातील माहिती भरणे, गृह मतदानाच्या दरम्यान मतपत्रिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पोलीस, होमगार्ड, रेल्वे यामध्ये नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे टपाली मतदान प्रक्रिया करण्यासाठी सर्व संबंधित माहितीचे संकलन करून संबंधितांना टपाली मतपत्रिका वाटप आणि त्यांचे मतदान करून घेणे आवश्यक आहे.  गृह मतदान करून घेत असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही पार पाडावी.

पोलीस अधीक्षक ग्रामीण आणि पोलीस आयुक्त कार्यालयाने पोलीस विभागातील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान प्रक्रियेचा संकलित माहिती करून मतदानाच्या नियोजनासाठी डेटा उपलब्ध करून द्यावा,असेही निर्देश देण्यात आले.

शिक्षकांनी मतदार जनजागृतीत योगदान द्यावे

शिक्षक म्हणून निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पाडत असतांना शिक्षकांनी मतदार जनजागृती उपक्रमातही  आपले योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शिक्षक मेळाव्यात केले.

येथील १०७ औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी स्वीप  उपक्रमाचा भाग म्हणून आज मौलाना आझाद सभागृहात शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, स्विप नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, संजीव सोनार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शिक्षक हा व्यवसाय जरी असला तरी ह्या व्यवसायाल प्रतिष्ठा आहे. आपण केवळ शिक्षणाचे काम करीत नाहीत तर एक पिढी घडवित असतात. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणूका ही आपल्या देशाचे, राज्याचे भवितव्य घडविण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड करण्याची संधी असते. त्यासाठी मतदान हे कर्तव्य बुद्धीने करणे आवश्यक आहे. हे महत्त्व एक शिक्षक चांगल्या पद्धतीने मतदारांना सांगू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी मतदार जनजागृतीत आपले योगदान द्यावे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

देशाचे युवक हे देशाचे भविष्य आहेत. तेव्हा आपले भवितव्य ठरवणारे आपले लोकप्रतिनिधी कोण असणार याची निवड करण्याची संधी ही आपल्याला …

पुढे वाचा

Maharashtra Chhatrapati Sambhajinagar

Join WhatsApp

Join Now