Share

‘तो माझा धाकटा भाऊ…’; अजितदादांच्या आठवणीत नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा वहिनींबद्दल म्हणाले…

अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. ‘तो माझा धाकटा भाऊ होता’ म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांच्या जबाबदारीवरही महत्त्वाचे भाष्य केले.

Published On: 

Nana Patekar on Ajit Pawar: नाना पाटेकर भावूक! सुनेत्रा पवारांबद्दल म्हणाले...

राजकारणातली मैत्री आणि नाती किती खरी असतात, यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. पण जेव्हा एखादा जिवाभावाचा माणूस सोडून जातो, तेव्हा जुन्या आठवणींचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने अवघ्या महाराष्ट्राला चटका लावला आहे. याच दु:खात सहभागी होत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “तो माझा नुसता मित्र नव्हता, तर धाकट्या भावासारखा होता,” असे सांगताना नानांचा कंठ दाटून आला होता.

२८ जानेवारी २०२६ रोजी अजितदादांनी जगाचा निरोप घेतला आणि राजकीय वर्तुळासह सिनेसृष्टीतही मोठी पोकळी निर्माण झाली. गुरुवारी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना नाना पाटेकर यांनी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मी अजितला तो १९-२० वर्षांचा असल्यापासून ओळखतो. एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा नेता हा त्याचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्याच्या जाण्याने झालेले दु:ख शब्दांत मांडता येणार नाही.”

Nana Patekar on Ajit Pawar

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावर बोलताना नाना म्हणाले, “सुनेत्रा वहिनींचं दु:ख आभाळाएवढं आहे आणि ते त्यांना एकटीलाच सोसावं लागणार आहे. ही जबाबदारीही त्या खंबीरपणे पेलतील, पण यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागेल.”

दुसरीकडे, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही नानांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. “रोहितने आपले काका गमावले आहेत. अशा वेळी मनात असंख्य प्रश्न उभे राहणे आणि ते विचारणे स्वाभाविक आहे,” असे म्हणत त्यांनी रोहितच्या भावनांची पाठराखण केली. अजितदादांच्या जाण्याने केवळ राजकारणाचेच नव्हे, तर वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना नानांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही