Share

Bigg Boss Marathi: “‘मी जुन्नरची, आमच्याकडे बांगड्यांऐवजी तलवार देतात…”; दिव्याचा बिग बॉसवर आरोप

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही बांगड्यांऐवजी तलवार घेतो,” असं म्हणत तिने आपली बाजू मांडली असून चॅनेलला खुलं आव्हान दिलं आहे.

Published On: 

Divya Shinde Eviction: 'बांगड्यांऐवजी तलवार...'; दिव्याचा बिग बॉसवर आरोप

बिग बॉसच्या घरात भांडणं नवीन नाहीत, पण यावेळी विषय थेट ‘तलवारी’ पर्यंत गेला आणि एका तगड्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. पण खरंच हे असं घडलंय का? ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 6) सहावा सीझन सध्या एका वेगळ्याच राड्यामुळे गाजतोय. ट्रॉफीची दावेदार मानली जाणारी दिव्या शिंदे (Divya Shinde) अचानक घराबाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला. बिग बॉसने तिच्यावर हिंसा आणि शस्त्राचा वापर करण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवला. पण बाहेर आल्यावर दिव्याने जे सांगितलं, त्याने शोच्या निर्मात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

दिव्या शिंदेवर आरोप होता की तिने घरात तलवारीची भाषा केली. यावर पत्रकारांशी बोलताना दिव्याचा पारा चढला. ती म्हणाली, “मी जुन्नरची आहे, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते. शृंगारच्या आधी स्वाभिमानाने जगणं शिकवलं जातं.” तिने स्पष्ट केलं की तिचं बोलणं हे ‘वैचारिक तलवारी’बद्दल होतं, खऱ्या शस्त्राबद्दल नाही. “शिवनेरीवर जन्म झालाय, त्यामुळे स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्त्वाचा आहे,” असं तिने ठणकावून सांगितलं.

Divya Shinde Eviction On Bigg Boss

विशेष म्हणजे, बिग बॉसने तिला ‘निष्काषित’ केल्याचा दावा तिने खोडून काढला. “मी कन्फेशन रूममध्ये (Confession Room) स्वतःहून शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, मला त्यांनी काढलेलं नाही,” असा मोठा दावा तिने केला. “अर्धसत्य दाखवून माझी इमेज खराब केली जातेय, हिंमत असेल तर ती पूर्ण क्लिप दाखवा,” असं खुलं चॅलेंजच तिने चॅनेलला दिलं आहे. दिव्याने कोणाचीही माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला असून आता या प्रकरणावरून सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही