Shahajibapu Patil | सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना शिवसेनेचे (शिंदे गट ) विधानसभेचं तिकीट मिळालं आहे. शिवसेने कडून तिकीट मिळाल्यानंतर शहाजीबापू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, की” विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन तसेच संजय राऊत हा भुकणारा महाराष्ट्रातला कुत्र्यासारखा माणूस आहे. त्याचा फार विचार करण्याची गरज नाही’, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील केले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले “संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत, मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार असा इशारा शहाजीबापू यांनी दिला. महाराष्ट्राला बौद्धिक दृष्ट्या भडकवणे, फेक नेरेटिव्ह तयार करणे, लोकांच्यात एक भीतीग्रस्त वातावरण तयार करणे आणि काम करत असलेल्या नेत्यांबद्दल कलुषित वातावरण निर्माण करून सत्तेची राजकीय पोळी भाजण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू (Shahajibapu Patil) म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब आहे. त्यामुळे काही मर्यादा आम्ही पाळतो परंतु संजय राऊतवर बोलताना मी कसलीही मर्यादा पाळणार नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या