Ajit Pawar यांनी सांगलीतील ( तासगाव ) येथील सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आरोप केले.
पवार म्हणाले “माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला.
त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी आरोप केला.
यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ”सिंचन घोटाळा हा काय अजित पवार यांची पाठ सोडत नाही. मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता. मी माझ्या कार्यकाळात कधीच 70 कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही. माझी कुठल्याही फाईलवर सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती, माझा नाहक बळी घेतला आणि 2014 साली अजित पवार यांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली.” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Prithviraj Chavan vs NCP Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन- Devendra Fadnavis
- पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नाही; Raj Thackeray यांचा Eknath Shinde आणि अजित पवारांना टोला
- “विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन”; शहाजीबापू यांचं मोठं वक्तव्य