Share

देवेंद्र फडणवीस बीडमध्ये पण Dhananjay Munde रुग्णालयात, नेमकं कारण काय?

🕒 1 min read Dhananjay Munde । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde),आमदार सुरेश धस (Suresh Dhas), खासदार बजरंग सोनावणे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde), जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna … Read more

by MHD

Published On: 

Devendra Fadnavis in beed but Dhananjay Munde hospital for eye surgery

🕒 1 min read

Dhananjay Munde । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde),आमदार सुरेश धस (Suresh Dhas), खासदार बजरंग सोनावणे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde), जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परंतु, सातत्याने राजीनाम्याची मागणी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आष्टी मतदारसंघातील (Ashti Constituency) खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते केले आहे. परंतु, धनंजय मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

“माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने सर यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल,” अशी माहिती मुंडेंनी दिली आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यांनतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आष्टीमधील खुंटेफळ तलावामुळे 30 गावांतील तब्बल 80 हजार एकर ओलिताखाली येणार आहे.एकूण 2800 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dhananjay Munde hospital for eye surgery

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. इतकेच नाही तर त्यांनी थेट धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही नाव घेऊन टीका केली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि मराठा आणि वंजारी समाजाच्या वादावर फडणवीस काय बोलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही