Share

आरक्षणासाठी Manoj Jarange Patil पुन्हा आक्रमक, थेट सांगितला प्लॅन

Manoj Jarange Patil । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच त्यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. परंतु, आता पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून इशारा दिला आहे. (Manoj Jarange on Maratha Reservation) “तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच मागे हटणार नसून तुम्ही … Read more

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil mega plan for Maratha reservation

Manoj Jarange Patil । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच त्यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. परंतु, आता पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून इशारा दिला आहे. (Manoj Jarange on Maratha Reservation)

“तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच मागे हटणार नसून तुम्ही कितीही ताकद लावा, आम्ही आरक्षण मिळवणारच आहे. येत्या 22 फेब्रुवारी ते 22 मार्च महिन्यामध्ये गाठी भेटी नियोजन करत गावातील अडचणी समजून घेणार. या कालावधीत छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा येथे तुमच्या अडचणी घेऊन या. त्या अडचणी सोडवल्या जातील,” असा शब्द जरांगे पाटील यांनी दिला आहे.

तसेच मनोज जरांगे पाटील लवकरच आझाद मैदानात आंदोलन (Manoj Jarange Patil Strike) करणार आहेत. कुणबी आणि मराठा एकच असून हे विदर्भ आणि खानदेशमध्ये असणाऱ्या मराठ्यांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil Strike for Reservation

दरम्यान, नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर त्यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. “कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही यापुढे सुरु राहील. कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ दिली. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करून त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही केली जाईल. राज्यातील मराठा आंदोलकावर दाखल करण्यात आलेल्या केसेस, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाईस गती देण्यात येईल,” या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही