Share

“जेवढ्या मर्यादा दिल्या तेवढेच…”; धनंजय देशमुखांचा Laxman Hake यांच्यावर निशाणा

by MHD
Dhananjay Deshmukh targets Laxman Hake in Santosh Deshmukh murder case

Laxman Hake । ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बाजू घेत धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी जरांगेच्या नादी लागू नये. नाही तर या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते, असा सल्ला दिला होता. हेच प्रकरण आता त्यांच्या अंगलट आले आहे. धनंजय देशमुख यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“लक्ष्मण हाके यांनी माझ्यावर बोलण्याचा प्रयत्न चुकीचा केला आहे. जर ते सांगताना न्यायाच्या भूमिकेत असते तर त्यांना उत्तर दिले असते. जर हत्येनंतर जरांगे पाटील इथे आले नसते, ते 11 तास न्यायासाठी रस्त्यावर बसले नसते, तर हे प्रकरण फक्त 8 ते 10 दिवसांकरिता मर्यादित राहिले असते. आम्ही न्याय मागण्यासाठी पाताळात देखील जाऊ. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या मर्यादा दिल्या आहेत, तेवढेच बोलावे,” असा सल्ला धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या आरोपांनंतर राज्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके (Manoj Jarange Patil Vs Laxman Hake) असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आपले काय मत मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Dhananjay Deshmukh on Laxman Hake

इतकेच नाही तर यापूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती, पण ते प्रकरण नामदेव शास्त्रींच्या अंगलट आले. त्यांनंतर आता लक्ष्मण हाके पुन्हा ओबीसी जातीचे राजकारण करत धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे. यावरून देखील हाके अडचणीत आल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Laxman Hake । ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बाजू घेत धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) …

पुढे वाचा

Marathi News Maharashtra