Dhananjay Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. यामुळे धनंजय मुंडे हे आपला राजीनामा देणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुंडे अडचणीत आले आहेत.
मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून (Parli Assembly Constituency) आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचा आरोप केला जात आहे. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे.
मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे. आता या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.
या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला जात आहे तर आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.
Notices to Dhananjay Munde
जर धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचे समोर आले तर मुंडे गोत्यात येऊ शकतात. नाइलाजाने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे बोलले जात आहे. यावर मुंडे काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :