Share

‘त्या’ प्रश्नांवर उत्तर न देता Dhananjay Munde यांनी पुन्हा पुढे केली ‘जात’, म्हणाले…

by MHD
Dhananjay Munde not answered Anjali Damania Accusation

Dhananjay Munde । आज पत्रकारपरिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारपरिषदेत राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

दमानिया यांच्या पत्रकारपरिषदेनंतर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. परंतु, मुंडे यांना दमानियांनी केलेल्या गंभीर आरोपांना अपेक्षित उत्तर देता आले नाही. याउलट त्यांनी मी अमुक जातीचा असल्याने मला बदनाम केले जात असल्याचा दावा केला आहे.

आरोपांचे खंडन न करता मुंडेंनी माझं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या जातीचं मीडिया ट्रायल होत असून मी मागील 59 दिवसांपासून हे सगळं सहन करत आलो आहे, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर नेटकरी संतप्त झाले आहे. मुंडेंना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मुंडेंनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या (Namdev Shastri Maharaj) पाठिंब्यानंतरही जातीचा विषय काढला होता. आताही पुन्हा एकदा जो मुद्दा काढायचा नव्हता नेमका तोच मुद्दा धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा उचलून धरल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यामुळे आता नेटकरीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत.

धनंजय मुंडे यांना आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. किती दिवस जातीचा मुद्दा पुढे करत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी डावलतील, असा सवाल देखील सर्वस्तरातून उपस्थित केला जात आहे.

“अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे,” असा इशारा मुंडेंनी दमनीयांना दिला आहे.

Dhananjay Munde on Anjali Damania

“माझ्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णत: खोटे आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. आजपर्यंत दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनी पाहावे. केवळ स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही,” असेही मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Dhananjay Munde । आज पत्रकारपरिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now