Virat Kohli । यावर्षी इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल (IPL) च्या 18 व्या सीजनला 21 मार्चपासून सुरुवात होईल. असे असले तरी अजूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाची घोषणा केली नाही. अशातच आता संघाच्या कर्णधारपदाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
आरसीबीचे सीओओ राजेश मेनन (Rajesh Menon) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. “कर्णधारपदाबाबत आम्ही अजून निर्णय घेतला नाही. आमच्याकडे संघात 4-5 लीडर आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेऊन चर्चा केली जाईल, अशी माहिती राजेश मेनन यांनी दिली आहे.
आयपीएलमधील विराट कोहली हा तिसरा सर्वात अनुभवी कर्णधार असून त्याने 143 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे . 2021 नंतर फाफ डु प्लेसिसने काही वर्ष आरसीबीचं कर्णधारपद नेतृत्व केले. परंतु, यंदा फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) ला आरसीबीने (RCB) रिटेन केले नाही. इतकेच नाही तर त्याला ऑक्शनमध्ये देखील संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे यंदा पार पडणाऱ्या आयपीएलमध्ये आरसीबीला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.
आरसीबीने यंदा विराट कोहलीला एकूण 21 कोटी रुपये मोजत आपल्या संघात कायम ठेवले आहे. विराटाच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. संघाला किमान यंदातरी विजेतेपद मिळवून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Rajesh Menon on RCB captain
दरम्यान, मागील हंगामात आरसीबीने गुणांच्या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवले. पण एलिमिनेटर मध्ये संघाला फटका बसला. त्यामुळे यंदाच्या हंगामात संघाची कामगिरी कशी असेल? हे पाहणे आता मनोरंजक असेल.
महत्त्वाच्या बातम्या :