Share

“Dhananjay Munde लफडेबाज, त्यांची ईडी चौकशी करा; मनोज जरांगेंची मोठी मागणी

🕒 1 min read Dhananjay Munde । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 275 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde) … Read more

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil demanded ED investigation of Dhananjay Munde

🕒 1 min read

Dhananjay Munde । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 275 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde)

“धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढून टाका. कारण त्यांनी या पदावरून राहून पुरावे नष्ट केले आहेत. जर संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आणि खंडणी प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जबाबदार धरू. अजित पवारांना माहिती असूनही ते मुडेंना पाठीशी घालत असून मुंडेंची ईडी चौकशी करा,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

“धनंजय मुंडे यांच्यावर मकोका लावा. इतकेच नाही तर त्यांच्यावर थेट 302 चा गुन्हा दाखल करा. कारण तेच संघटीत गुन्हेगारी घडवून आणत असून तेच या सगळ्यांचे मालक आहेत,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde

जरांगे पाटील यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कालच त्यांनी निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड रात्री 2 वाजता भेटायला आले असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)