Share

“Dhananjay Munde यांनी केला तब्बल 275 कोटींचा भ्रष्टाचार”, Anjali Damania यांचा गंभीर आरोप

by MHD
Anjali Damania accused Dhananjay Munde of corrupting 275 crores

Anjali Damania । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

“शेतकऱ्यांना डिबीटीद्वारे पैसे मिळणार होते. पण तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी नॅनो युरिया तसेच नॅनो डिएपीम खरेदीत तब्बल 275 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांनी त्यांच्या काळात नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी केले होते, तसेच गोगलगायी निर्मुलनाचं औषधही मोठ्या दराने खरेदी केले होते,” असा दावा दमानिया यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांनी एकेका बॅटरी स्प्रेअरमध्ये पैसे लाटले होते. तसेच 50 कोटींचे डिलरशीपचे नियम बदलले होते. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदी 42 कोटींचा घोटाळा केला आहे,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांंनी केला आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राजकारणात मोठा भूकंप आला आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

Anjali Damania । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now