Share

Ajit Pawar यांचा धनंजय मुंडेंना पहिला धक्का, घेतला मोठा निर्णय

by MHD
Ajit Pawar give orders internal party inquiry into Dhananjay Munde Accusation

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळातून जोरदार होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यवरून राजकीय दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.

अशातच आता अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्ष धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) होते. या काळात झालेल्या कामांची आता सखोल चौकशी होणार आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.

बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात (Beed District Planning Committee Fund Allocation) दुजाभाव झाल्याचा आरोप केला जात असल्याने नियोजन विभागाने एक समिती नेमली आहे. या समितीला एका आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Ajit Pawar big blow to Dhananjay Munde

दरम्यान, ही समिती मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्यासाठी निधी वितरण याची चौकशी केली जाणार आहे. हा मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळातून जोरदार होऊ लागली आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD