Vijay Wadettiwar । भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला आहे.
“गुन्हेगारांचे समाज त्यांना पाठीशी घालायला लागले तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहणार नाही. शासन म्हणून राज्य सरकारला देखील आपली जबाबदारी कळायला हवी. एखाद्या घटनेला समाजावर नेणे योग्य नाही,” असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुढे वडेट्टीवार म्हणाले की, “अमुक आमच्या समाजाचा, तमुक तुमच्या सामाज्याचा, यांच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करून बिहार करायचा असा आहे का? कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालू नये. नामदेव शास्त्री यांनी आपली मर्यादा राखावी,” असा सल्लाही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
Vijay Wadettiwar on Namdev Shastri Maharaj
दरम्यान, नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी विनंती पोलीस अधीक्षकांना केली आहे. यामुळे नामदेव शास्त्री यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :