Vijay Wadettiwar । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
लवकरच ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. “जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून नाराजी जाणवते. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? आपण फक्त अंदाज बांधू शकतो,” असे वडेट्टीवार म्हणाले.
“ते कोणत्या अर्थाने बोलले हे मला माहित नाही. पण या सगळ्या बावड्या होत्या. बदनाम करण्यासाठी सत्ताधारी वावड्या उठवत असतात. सतत त्यांच्या कुरघोड्या सुरू असतात. मुनगंटीवारांचे भाषण ऐकल्यावर त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कृपा दिसते. त्यांच्या उपकाराखाली तर दबले आहेत,” असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
Vijay Wadettiwar on Uday Samant
पुढे ते म्हणाले की, “मी कधीच कोणाला भेटलो नाही. मी काँग्रेसचा नेता असून इकडचा मालक तिकडे जाण्यासाठी मी मूर्ख नाही. उदय सामंत (Uday Samant) हे माझे मित्र आहेत. त्यांना कधी कधी वाटते आमच्या सोबत यावे म्हणून ते असे बोलत असतात. दिवस बदलतात आणि कधीतरी ते आमच्या सोबत येतील,” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवारांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :